Father of Green revolution in Maharashtra/ महाराष्ट्र कृषी दिन/ Maharashtra Agricultural Day


Maharashtra Agriculture Day/ महाराष्ट्र कृषीदिनाचे महत्व


दरवर्षी १ जुलै रोजी महाराष्ट्रामध्ये कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1 जुलै ते 7 जुलै हा आठवडा राज्यात कृषी सप्ताह म्हणूनही साजरा केला. हा दिवस स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 


कृषीप्रधान देश अन कृषीप्रधान राज्य 


महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते तर भारत हा अजूनही कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राज्याच्या अन देशाच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. 


महाराष्ट्र हे भारतातील मुख्ये उत्पादक राज्यांपैकी एक राज्य आहे. अनेक उत्पादनांसाठी देशभरातील अनेक राज्ये महाराष्ट्रावर अवलंधून असतात. कधी कधी दुर्मिळ पावसामुळे, महागाईमुळे 'शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून "कृषी दिवस" या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक व्यासपीठ आहे. 

कडाक्याचे ऊन असो वा, सोसाट्याचा वारा किंवा बरसत असतील जरी पावसाच्या ओल्याचिंब धारा तरी राबत असतो आपला शेतकरी जय जवान जय किसान चा नारा 

शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि वास्तव


आज आपण बघतो की शेतकऱ्याचे कष्ट अन त्याला मिळणारा मोबदला यात खूप तफावत आहे. शेती माल जरी चांगला पिकाला तरी त्याला भाव मिळेल याची शाश्वती नाही.

मित्रानो कल्पना करा, शेतकयांनी अन्नधान्य पिकवणेच बंद केले तर...? आपल्याला कल्पनाही करवत नाही कारण "अन्न" हे मानवाची मुलभूत गरज आहे. आपला देश कृषी प्रधान असून देखील शेतकऱ्याला आंदोलन करावी लागतात अन दुर्दैव म्हणजे सरकार कडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. 


शेतकऱ्याचा करू सन्मान, यातच खरा देशाचा, अभिमान. 
जन जनात संदेश पोहचवुया, बळीराजाला आत्महत्येपासून रोखुया ।

ज्यादिवशी शेतकयांच्या व्यथा थांबतील, त्यादिवशी खऱ्या अर्थाने "कृषी दिन" साजरा केल्याचे सार्थक होईल.