आषाढी एकादशी... देवशयनी एकादशी

नमस्कार मित्रांनो, आज "आषाढी एकादशी..." आपल्या पंढरीची वारी बद्दल थोडंस जाणून घेऊ...

आषाढी वा देवशयनी एकादशीचे महत्व...


आषाढी एकादशी म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहते ते विठ्ठलाचं मंदिर, चंद्रभागेचा तीर, पायी चालणारा वारकरी, संतांच्या दिंडया आणि भोळ्या भाबड्या भक्ताच्या दर्शनासाठी असलेल्या रांगा...वर्षातील एकूण 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीचे एक वेगळेच महत्व आहे. आषाढ महिन्यातील या एकादशीला "देवशयनी एकादशी" किंवा आषाढी एकादशी असे ही म्हटले जाते.

आषाढी एकादशीला महाराष्ट्रात एक वेगळेच महत्व आहे. या दिवशी विठ्ठलासाठी उपवास धरला जातो. सावळा, मोहक अशा विठ्ठलाला विष्णूचे रूप मानले जाते.
या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे अजून एक कारण म्हणजे या दिवसापासून देव झोपी जातात अशी धारणा आहे.

आस विठ्ठल भेटीची...

आषाढी एकादशीला पंढरपूरात आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहुहून तुकारामांची, त्रंबकेश्वरहुन निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तरभारतातून संत कबीरांची दिंडी येते. 

विठठलाचे दर्शन घेण्यास लाखो भाविक वारीत सामिल होतात याच एकमेव कारण म्हणजे येणाऱ्या सर्वांवर समभाव प्रेम करणारा आणि संकटाला तारुण आधार देणारा हाच सकलांचा आधार हा विठ्ठल होतो. या सर्व वारकऱ्यांसाठी हरीस्मरण हाच मुख्य धर्म आहे आणि एकच पाठ... 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी वारी करतात अन जे वारीला येऊ शकत नाहीत ते उपवास करून मनोभावे पूजा करतात, अशी हिंदू धर्मातील आषाढी एकादशी !

"युगे अठ्ठावीस विटेवरी उभा..."


आज लाखो वारकरी पंढरपुराकडे पायी चालत आहेत. त्यांचा आनंद आणि विठ्ठलाला भेटण्याची ओढ शब्दात सांगता येणार नाहीत. पंढरपुरात पोहचातच एस टी स्टॅंडपासून सुमार 2 km अंतरावर चंद्रभागा नदी आहे चांद्रभागेला दक्षिण कशी असे ही संबोधले जाते. चंद्रभागेला पोहचल्यावर चंद्रभागेमध्ये स्नान करून गंध टिळा लावून येणारा विठू भक्त दर्शनाला पोहचतो ते भक्त पुंडलीकाच्या चरणी... अशी कथा आहे की, भक्त पुंडलीकाला दर्शन देण्यासाठीच पांडुरंग पंढरपुरात अवतरला परंतु भक्त पुंडलीक हा आपल्या आई-वडीलांची सेवा करण्यात इतका दंगला की त्याने पांडुरंगाच्या दिशेने वीट देऊन त्याला थांबण्यास सांगितलं आणि भोळा विठ्ठल ही आपल्या भक्तासाठी विटेवर थांबला तो कायमचाच !

म्हणूनच युगे अठ्ठावीस विटेवरी उभा...

मुख दर्शन घ्यावे आता...


...त्यानंतर पाऊले आपोआप वळतात ते विठ्ठल दर्शनासाठी. मंदीराचे मुख्य प्रवेशव्दार पूर्व दिशेला आहे आणि त्यासमोर संत चोखामेळा समाधी आहे. आपण संत चोखामेळाचे दर्शन होऊन पुढे वळतो ते नामदेव- पायरी कडे. संत नामदेव हे पांडुरंगाचे आवडते भक्त. त्यांना असे वाटायचे विठ्ठल चरणी कायम असावे. नामदेव पायरीवर माथा टेकवून आपण पुढे मंदीरात प्रवेश करतो आणि सभामंडपात आपला प्रवेश होतो. सभागृहाची रेखीव रचना न्हयाळत आणि गरुड खांबांची गळाभेट घेऊन आपण पुढे मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो आणि ज्या साठी आपले प्राण आसुसलेले असतात त्या विठुरायला आपण समोर पाहतो अठ्ठावीस युगे कडेवर हात ठेवून, विटेवर उभा आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ... खरं सांगायचं तर जीवन सार्थकी लागतं आपलं!

विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपण वळतो ते रुक्मिणी मातेच्या दर्शनाला, मुख्य गाभाऱ्याच्या पाठिंमागेच मातेचे मंदिर आहे.



English Translations: 


Importance of Ashadhi or Devshayani Ekadashi...


Ashadhi Ekadashi says that what stands before the eyes is the temple of Vitthal, the arrow of Chandrabhaga, the walking Varkari, the dindyas of the saints and the queues for the sight of innocent devotees... Out of the total 24 Ekadashis in the year, Ashadhi Ekadashi has a special significance. This Ekadashi in the month of Ashadha is called "Devshayani Ekadashi" or Ashadhi Ekadashi.

Ashadhi Ekadashi has a special significance in Maharashtra. A fast is observed for Vitthal on this day. The shadowy, charming Vitthala is considered to be a form of Vishnu.
Another reason why this Ekadashi is called Devshayan Ekadashi is the belief that the Gods go to sleep from this day.

Visiting Vitthal...

On Ashadhi Ekadashi, in Pandharpur, the Dindi of Dnyaneshwar comes from Dehu, Tukaram from Alandi, Nivrittinath from Trembakeshwar, Eknath from Paithan, Saint Kabir from North India.

The only reason why lakhs of devotees flock to see Vitthal is because Vitthal is the support of all who loves all who come and provides youthful support in times of trouble. For all these devotees, Harismaran is the main religion and the only re...

Lakhs of pilgrims from every corner of Maharashtra go on foot and those who can't come, fast and worship with devotion on Ashadhi Ekadashi in Hinduism!


Today lakhs of pilgrims are walking towards Pandharpura. Their happiness and love to meet Vitthala cannot be expressed in words. On reaching Pandharpur, about 2 km from the ST stand, Chandrabhaga river is called Chandrabhaga as the south. After reaching Chandrabhaga, the Vithu devotee who bathes in the Chandrabhaga and puts on incense sticks reaches the feet of Bhakta Pundalika... There is a story that Pandurang came down to Pandharpur to give darshan to Pundalika, but the devotee Pundalika was so busy serving his parents that he threw a brick towards Panduranga. He was told to stop and Bhola Vitthal stayed on the brick for his devotee forever!


Now let's have Face Darshan...

...Then the steps automatically turn to Vitthal Darshan. The main entrance of the temple is towards the east and in front of it is the Samadhi of Saint Chokhamela. After seeing Sant Chokhamela, we turn towards Namdev-Piri. Saint Namdev is a favorite devotee of Panduranga. They thought that Vitthal Charani should be there forever. Bowing down the Namdev steps, we further enter the temple and enter the hall. Taking in the outline of the auditorium and meeting the eagle pillars, we enter the main core and we see in front of us the stone for which our lives are longing twenty-eight yugas with hands on the sides, standing on the brick and a smile on the face ... To tell the truth, life is worth it!

After seeing Vitthala we turn to see Rukmini Mata, just behind the main gabhara is the mother's temple.

Every devotee who hugs Garudakhamba with the face of Baa Vitthal and My Rukmini starts his return journey with the promise of the next year.